ओअॅसिस - पान २३


पान २३



"हे.." गुलाबी वेष्ट्नामधला बॉक्स तिच्यासमोर नाचवत ते म्हणाले.

"ओह नो, कसा शोधून काढलात? मी स्वत: देणार होते तुम्हाला.." शारदा हिरमुसून बोलली

शारदाने देवदत्तांसाठी आणलेलं गिफ़्ट देवदत्तांच्या हाती लागलं होतं. लग्नाचा पहिला वाढदिवस म्हणून आज ते बाहेर फ़िरायला जाणार होते. त्यावेळेस देवदत्तांना हे गिफ़्ट द्‍यायचं, असं शारदाने ठरवलं होतं पण देवद्तांच्या हाती आधीच ते गिफ़्ट लागल्याने तिला आता ते सरप्राईज देता येणार नव्हतं.

"टू माय लव्हिंग हजबंड....हं.." देवदत्त बॉक्सवरच्या गिफ़्ट कार्ड्वर लिहिलेली ओळ वाचून म्हणाले. तेवढ्यात शारदाने त्यांच्या हातातून तो बॉक्स काढून घेतला.

"अरे, पाहू दे ना."

"नाही, आता नाही. संध्याकाळी," शारदा नाराजीच्या सुरात म्हणाली.

"मग आता काय..?" तिला आपल्या जवळ पुन्हा ओढत देवदत्त मिस्किल स्वरात विचारत होते.

त्यांचा स्वर ऒळखून दटावणीच्या सुरात ती म्हणाली, "आता काही नाही, आता फ़क्त ऑफ़ीस..."

"नाही पण मी काय म्हणतो...."

त्यांना पुढे बोलू न देता शारदा आपला हात सोडवून लांब पळाली.

"अगं.., शारदा, थांब..."

...आपल्याच ओरडण्याच्या आवाजाने देवदत्त जागे आले. शारदाच्या आठवणींमध्ये रमता रमता केव्हातरी त्यांचा डोळा लागला होता. त्यांना पूर्ण जाग आली आणि ते बेडवर उठून बसले. आपण जे पाहिलं ते स्वप्न होतं, शारदा आता आपल्यासोबत नाही, हे लक्षात आल्यावर त्यांच्या मनात पुन्हा खिन्नपणा दाटून आला. त्या खिन्नपणातून बाहेर पडण्यासाठी, त्यांनी एकटंच लॉंग ड्राईव्हला जाण्याचं ठरवलं. ही त्यांची नेहमीची सवय होती. मनात विचारांची खूप गर्दी होतेय किंवा उदास वाटतंय, असं वाटलं की ते लॉंग ड्राईव्हवर जात. गेल्या वर्षभरात ते एकदाही लॉंग ड्राईव्हला गेले नव्हते. हरीला आपली गाडी बाहेर तयार ठेवायला सांगून ते शॉवर घ्यायला गेले.

शॉवर घेता घेता, रोजच्या सवयीने त्यांच्या मनात कामाचे विचार सुरु झाले..."अगरवालला त्याचे हिंदी उपन्यास ’यज्ञ’तर्फ़े पब्लिश करायचेत, याचा ’यज्ञ’ला कितीपत फ़ायदा होईल........लिमयांची ऑर्डर पाहायची राहूनच गेली.........शेखरने ’पुस्तक-भंडार’ला कॉन्टॅक्ट केला होता की नाही, कळलंच नाही....." तेवढ्यात त्यांना आपल्या बेडरूममध्ये कोणीतरी आल्याची चाहूल लागली. शॉवर चालूच ठेवून त्यांनी हळूच बाथरूमचा दरवाजा उघडून पाहिलं. बाहेर कोणीच नव्हतं. कदाचित भास झाला असेल, असं वाटून त्यांनी पुन्हा दरवाजा बंद करून घेतला.

तयार होऊन ते गाडीपाशी आले तेव्हा, हरी गाडीची चावी हातात घेऊन त्यांची वाट पाहात उभा होता.






ही कथा सुरुवातीपासून वाचावयाची असल्यास येथे टिचकी द्‍या.



0 Comments:

Post a Comment

माझ्या साइटमध्ये सामील व्हा

हा कोड तुमच्या ब्लॉगवर लावा

कोड कॉपी पेस्ट करण्यासाठी Ctrl+C आणि Ctrl+V चा वापर करा.
living in India
Blogvani.com MyFreeCopyright.com Registered & Protected
MCN: BQ9D8-RRC42-B9AM5
marathisuchi - free marathi link sharing website & marathi blogs aggregator

मराठी ब्लॉगर्स

मोगरा फुलला on Twitter

या ब्लॉगचे चाहते

ताज्या प्रतिक्रिया

Disqus च्या सौजन्याने

उपस्थित वाचक

  © Blogger template On The Road by Ourblogtemplates.com 2009

Back to TOP