गॉड ब्लेस यू... - पान १४


“एक मिनिट! आय कान्ट हॅन्डल धिस टेन्शन.... प्रियाने मला कधीही तिचं माझ्यावर प्रेम आहे असं सांगितलं नाही.

सरकारी वकिलांनी मला “साक्षिसाठी हजर रहा,” असं सांगितलं, तेव्हा चर्चा करताना तेच म्हणाले होते की “एखादी मुलगी जर प्रियासारखी वाक्यं तुझ्यासोबत बोलत असेल तर याचा अर्थ असा होतो की त्या मुलीचं तुझ्यावर प्रेम आहे आणि ती ते तुला निरनिराळ्या प्रकारे सांगण्याचा प्रयत्न करतेय.” “म्हणून माझाही गैरसमज झाला होता. पण मला वाटतं प्रिया वॉज जस्ट फ्रेंडली....तिच्या मनात माझ्याविषयी प्रेमभावना होती असं मी ठामपणे सांगू शकत नाही.”

अमोलचं बोलून संपलं तेव्हा त्याच्या चेहेरा वाघाच्या तावडीतून सुटका झाल्यासारखा दिसत होता.

समीर खंदार्यांंकडे पहात होता आणि खंदारे अमोलकडे पाहून दातओठ खात होते.

समीरने जज्जसाहेबांना अभिवादन करत हसता हसता म्हटलं, “दॅट्स ऑल युवर ऑनर.”

अमोल प्रियाकडे पाहून मान खाली घालून निघून गेला.

“मि. खंदारे तुमचा पुढचा साक्षिदार किती वेळ घेईल?” जज्ज सिन्हांनी विचारलं.

“बराच वेळ घेईल.”

“तर मग त्याला पुढच्या तारखेसाठी राखून ठेवा. वेळ संपत आली आहे.”

“ओ.के. युवर ऑनर.”

जज्ज सिन्हांनी कोर्ट बरखास्त झाल्याचं जाहिर केलं आणि ते आपल्या आसनावरून उठले. त्यांच्या जाण्यानंतर लोकही हळूहळू कोर्टातून बाहेर पडू लागले. प्रिया दोन लेडी कॉन्स्टेबलच्या पहा-यात बाहेर पडली. जाता जाता तिने समीरकडे एकदा वळून पाहिलं. समीर तिच्याकडे पाहून प्रसन्न हसला. तिनेही हसून त्याचा निरोप घेतला.

पुढच्या तारखेपासून ख-या महत्वाच्या साक्षी सुरू होणार होत्या. प्रिया निर्दोष आहे, याची समीरला पूर्ण खात्री होती. त्याला फक्त सरकारी वकिलांनी सादर केलेल्या साक्षिदारांच्या उलटतपासणीतून सत्य कोर्टापुढे आणायचं होतं. पण काही प्रश्नांची उत्तरं अजून त्यालाही मिळाली नव्हती. त्यासाठी प्रियाची आणखी एक भेट घेणं त्याला भाग होतं.

संध्याकाळी साडेसातच्या सुमाराला समीर जेलमध्ये पोहोचला. जेलरला फोन करून आपण येत असल्याची सूचना आधीच दिल्याने त्याला प्रियाला भेटण्यात अडचण आली नाही.

जेलरला कोर्ट ऑर्डर दाखवून तो व्हिजिटर्स रुममध्ये पोहोचला तेव्हा प्रिया त्याच्या आधीच येऊन बसली होती. पण आज सकाळी जशी ती त्याच्याकडे पाहून हसली होती, तशी ती हसली नाही. चेहे-यावरची उदासीची छटा तिला लपवता आली नाही.

तिने काही बोलण्याआधीच समीरने तिला तोंडावर बोट ठेवून गप्प बसण्याची खूण केली आणि त्याने संपूर्ण रुमची तपासणी केली. वकील आणि अशील यांच्यातलं बोलणं ऐकण्यासाठी व्हिजिटर्स रुममध्ये ब-याचदा मायक्रोफोन अड्जस्ट केला जातो, हे समीरला आता चांगलं माहीत झालं होतं. कुठेही मायक्रोफोन लावलेला नाही याची खात्री पटताच तो पुन्हा प्रियाच्या बाकड्याजवळ गेला. प्रिया जाळीच्या पलिकडून समीरच्या बोलण्याची वाट पहात होती.





ही कथा सुरूवातीपासून वाचावयाची असल्यास येथे टिचकी द्या




1 Comments:

भुंगा Wednesday, August 05, 2009  

हुश्श...! पुढचे भाग लवकर लिहा हो!!!

Post a Comment

माझ्या साइटमध्ये सामील व्हा

हा कोड तुमच्या ब्लॉगवर लावा

कोड कॉपी पेस्ट करण्यासाठी Ctrl+C आणि Ctrl+V चा वापर करा.
living in India
Blogvani.com MyFreeCopyright.com Registered & Protected
MCN: BQ9D8-RRC42-B9AM5
marathisuchi - free marathi link sharing website & marathi blogs aggregator

मराठी ब्लॉगर्स

मोगरा फुलला on Twitter

या ब्लॉगचे चाहते

ताज्या प्रतिक्रिया

Disqus च्या सौजन्याने

उपस्थित वाचक

  © Blogger template On The Road by Ourblogtemplates.com 2009

Back to TOP