नवीन वर्षाच्या मन:पूर्वक शुभेच्छा!


’मोगरा फुलला’ ने १ डिसेंबर २००९ रोजी एक वर्ष पूर्ण केलं. या एका वर्षात मला तुम्हा सर्वांकडून भरभरून प्रेम मिळालं. लेखनासाठी आपुलकीच्या, वडीलकीच्या सूचना मिळाल्या, मित्र-मैत्रीणीही मिळाले. पुढच्या वर्षी जर मला लिहीण्याचा उत्साह असलाच, तर तो तुम्हा सर्वांच्या प्रतिसादामुळे आणि पाठींब्यामुळे असेल.

२००९ बरंच काही देऊन गेलं आणि बरंच काही घेऊनही गेलं. ब-या वाईट जुन्या आठवणी आणि भविष्यासाठी नवीन स्वप्नं उराशी बाळगून मी सरत्या वर्षाला अलविदा करतेय आणि येत्या वर्षाचं स्वागत! तुम्हा सर्वांची स्वप्न, आशा, इच्छा, आकांक्षा येत्या नवीन वर्षात पूर्ण होवोत.

उद्या मी बहुधा पूर्ण दिवस ऑनलाईन नसेन. शिवाय, शुभेच्छा देण्यासाठी पहिला नंबर लावण्याचा मोह आवरत नाहीये.

नवीन वर्षाच्या मन:पूर्वक शुभेच्छा! हसत-खेळत नवीन वर्षाचं स्वागत करा!





11 Comments:

Pankaj - भटकंती Unlimited Wednesday, December 30, 2009  

हाहाहा...!!! पहिला नंबर तर मी काल रात्रीच लावून टाकलाय :-)
नववर्षाच्या शुभेच्छा!!!

कांचन कराई Wednesday, December 30, 2009  

असं होय? हाहा! मला वाटलं ती भाग्यवान मीच! नवीन वर्षाच्या शुभेच्छा!

suhasonline Wednesday, December 30, 2009  

नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेछा..God Bless you

कांचन कराई Wednesday, December 30, 2009  

धन्यवाद सुहास. नववर्षाच्या शुभेच्छा! ईश्वरकृपेने आपले सर्व मनोरथ पूर्ण होवोत.

Anand Wednesday, December 30, 2009  

तुम्हाला नविन वर्षाच्या हार्दीक शुभेच्छा!!
नविन वर्षात तुमच्या कडुन अपेक्षा वाढल्यात, खुप कथा वाचायच्यात..:-)
तुमच्या मार्गदर्शनाखाली शिकायचे आहे, आणि तुमचा स्नेह असेल ही अपेक्षा.
खुप धन्यवाद!

कांचन कराई Wednesday, December 30, 2009  

सर्वांचा पाठिंबा असावा आणि माझ्या हातून चांगल्या कथा लिहिल्या जाव्यात हीच माझीही इच्छा आहे. मला इतकी मोठी करू नकोस. मी स्वत:देखील शिकते आहे. आपण दोघंही शिकू एकमेकांकडून :-)

सिद्धार्थ Thursday, December 31, 2009  

बरेच दिवस तुमच्या सार्‍या कथा वाचेन असं म्हणतोय. नवीन वर्षात नक्की वाचून पूर्ण करेन. नविन वर्षाच्या शुभेच्छा.

कांचन कराई Thursday, December 31, 2009  

जरूर वाचा. येत्या १ जानेवारी पासून नवीन कथा क्रमश: प्रकाशित होणार आहे, तीही वाचा. माझ्या ब्लॉगवर तुमचं स्वागत आहे.

अनामिक Thursday, December 31, 2009  

तुलाही नवीन वर्षाच्या शुभेच्छा!

-अनामिक

कांचन कराई Thursday, December 31, 2009  

धन्यवाद अनामिक.

Anonymous,  Tuesday, January 05, 2010  

HAPPY NEW YEAR TO ALL INDIAN

Post a Comment

माझ्या साइटमध्ये सामील व्हा

हा कोड तुमच्या ब्लॉगवर लावा

कोड कॉपी पेस्ट करण्यासाठी Ctrl+C आणि Ctrl+V चा वापर करा.
living in India
Blogvani.com MyFreeCopyright.com Registered & Protected
MCN: BQ9D8-RRC42-B9AM5
marathisuchi - free marathi link sharing website & marathi blogs aggregator

मराठी ब्लॉगर्स

मोगरा फुलला on Twitter

या ब्लॉगचे चाहते

ताज्या प्रतिक्रिया

Disqus च्या सौजन्याने

उपस्थित वाचक

  © Blogger template On The Road by Ourblogtemplates.com 2009

Back to TOP