नवीन लायब्ररी


काही चित्रपट वारंवार भेट देऊनही मला माझ्या नेहमीच्या सी.डी. लायब्ररीमधे मिळाले नव्हते. ते चित्रपट मिळवण्यासाठी किती सी.डी.ची दुकानं आणि लायब्र-या पालथ्या घातल्या असतील कुणास ठाऊक. या शोधमोहीमेमधे मल एक नवी सी.डी. व पुस्तकांची लायब्ररी मिळाली. या लायब्ररीचं नाव आहे, बुकमार्क लायब्ररी. ही लायब्ररी मुळात पुण्याची पण आता मुंबईमधे या लायब्ररीच्या चार शाखा आहेत. पहिली आहे दादर पश्चिमेला, दुसरी मिरा रोडला, तिसरी मुलुंडमधे आहे तर चौथी शाखा ठाणे येथील घोडबंदर विभागात सुरू होतेय. तसंच औरंगाबाद, कर्नाटक व गुजरातमधेही या लायब्ररीच्या शाखा आहेत.


या लायब्ररीच्या वेबसाईटचा पत्ता आहे. http://bookmarklibrary.co.in/. लायब्ररीच्या दादर शाखेला भेट द्यायची असेल, तर पोर्तुगीज चर्चच्या समोर जो फुटपाथ आहे तेथून प्रभादेवीला जाण्याच्या दिशेने (प्लाझाकडे पाठ करून) वळल्यास कोप-यावरच ही लायब्ररी दिसेल. सकाळी ९:३० ते रात्री ९:३० अशी लायब्ररीची वेळ आहे व सोमवारी लायब्ररी बंद असते.


इथे तुम्हाला सभासद होण्यासाठीचे निरनिराळे प्लान मिळतील. सी.डी.च्या सोबत पुस्तकही घेऊन जाता येईल असा एक प्लान आहे यात. पण इथे केवळ मोठ्यांसाठीच नाही, तर लहानांसाठीही पुस्तके व खेळणी यांची लायब्ररी उपलब्ध आहे. तसंच पी.सी. गेम्सही उपलब्ध आहेत. लायब्ररीमधील पुस्तके व सी.डी. दर महिन्याला बदलत रहातात त्यामुळे रसिकांना सतत नवीन स्टॉक मिळत रहातो. शिवाय उपलब्ध नसलेलं एखादं जुनं पुस्तक किंवा चित्रपट आपण तिथे मागवूही शकतो.



4 Comments:

विक्रम एक शांत वादळ Sunday, January 24, 2010  

मलाही माझ्या आवडत्या एका चित्रपटाची सी डी मिळत नाहीये कितीही शोध घेतला तरी :(
'दुनिया दिलवालो कि' त्यात ते मुस्तफा मुस्तफा गाणे आहे ते

कोठे मिळेल समजेल का ?
आणि हो लिंकबद्दल धन्यवाद

कांचन कराई Sunday, January 24, 2010  

त्या लायब्ररीमधे चेक करून पहाते आणि सांगते. हा चित्रपट युट्युबवर उपलब्ध नाही का?

भुंगा Wednesday, January 27, 2010  

चांगली सुविधा आहे ही.. आम्ही सुरु केलीय - गेल्या महिन्यापासुन - माझ्यासाठी सी.डी.ज् .. बायकोसाठी काही पुस्तकं आणि छोकरीसाठी गोष्टींची पुस्तकं!

कांचन कराई Wednesday, January 27, 2010  

हो, मलासुद्धा आवडली ही सुविधा. मी गेल्याच आठवड्यात सभासद झाले आहे.

Post a Comment

माझ्या साइटमध्ये सामील व्हा

हा कोड तुमच्या ब्लॉगवर लावा

कोड कॉपी पेस्ट करण्यासाठी Ctrl+C आणि Ctrl+V चा वापर करा.
living in India
Blogvani.com MyFreeCopyright.com Registered & Protected
MCN: BQ9D8-RRC42-B9AM5
marathisuchi - free marathi link sharing website & marathi blogs aggregator

मराठी ब्लॉगर्स

मोगरा फुलला on Twitter

या ब्लॉगचे चाहते

ताज्या प्रतिक्रिया

Disqus च्या सौजन्याने

उपस्थित वाचक

  © Blogger template On The Road by Ourblogtemplates.com 2009

Back to TOP