सदैव – पान ८
आतापर्यंत सर्व हुनने ऐकून घेतलं पण शेवटचं वाक्य त्याच्या सहनशक्तीपलिकडचं होतं. तो तिरीमिरीने उठला आणि त्याने फेईच्या पोटात लाथ मारली. फेई भेलकांडत मागे पडला तशी हुनने फेईच्या हातातील तलवार हिसकावून घेतली आणि तो फेईवर वार करणार इतक्यात त्याने मोईचं आक्रंदन ऐकलं.
मोई मानेने ’नाही नाही’ म्हणत मागे मागे सरकत होती. अश्रूंनी तिचा संपूर्ण चेहेरा भिजला होता. हुन तिच्या जवळ जाण्यासाठी पुढे गेला पण मोईने सरळ पाठ वळवली आणि ती आपल्या घराच्या दिशेने पळत सुटली. दु:ख व्यक्त करावं की राग हेच हुनला कळेना. त्याने झाडाच्या बुंध्यावर जोरात एक ठोसा मारला. या सर्वाला कारण असलेला फेई मात्र हुनचा डोळा चुकवून पळून गेला होता.
स्वत:च्याच तोंडात मारून घ्यावं, खूप रडावं असं मोईला फार फार वाटत होतं. पण घरी गेल्यावर वडीलांना काम करताना पाहून मोईने आपल्याला भावनांना आवर घातला. फाटलेले कपडे नि त्यावर पांघरलेला अंगरखा त्यांच्या लक्षात येऊ नये म्हणून ती मागल्या दाराने घरात शिरली. पटकन कपडे बदलून वडीलांशेजारी येऊन बसली.
“आज तर खूपच उशीर झाला तुला, बाळ.” मोईचे वडील म्हणाले.
“अं... हो बाबा, आज मला जास्त वेळ थांबावं लागलं म्हणून परतायलाही उशीर झाला.” मोई स्वत:ला सावरत म्हणाली.
“खरं तर तुला असं दुस-याकडे पाठवायला माझं मन तयार नसतं बाळ पण....”
“बाबा, मी त्याबद्दल काही बोलले का कधी. तुम्हाला कामात मदत करायला मला नेहमीच आवडतं.”
“हो, पण असं किती दिवस चालणार. कधी ना कधी तुला लग्न करावंच लागेल.”
जे मोई विसरू पहात होती नेमकं तेच वडीलांनी बोलून दाखवल्यावर मोईच्या मनाचा बांध फुटला. ती आपल्या वडीलांना बिलगून रडू लागली.
“नाही, नाही, बाबा. मी तुम्हाला सोडून कधीच जाणार नाही. बाहेरचं हे जग म्हणजे नुसतं जनावरांचं जग आहे. मला इथेच राहू द्या, तुमच्यासोबत.”
वडीलांनी मोईच्या केसातून हात फिरवला आणि म्हटलं, “मला कळते तुझी मन:स्थिती, मोई. म्हणूनच डोळे मिटण्याआधी तुझे हात एका समर्थ रक्षकाच्या हातात सोपवून जायचंय.”
मोईला काय उत्तर द्यावं कळेना. तुंगच्या रूपाने तिला आणि तिच्या वडीलांना हवा तसा रक्षक तिला मिळाला होता पण त्याची खरी ओळख कळल्यावर मोईला त्याच्याबद्दल तिरस्कार वाटू लागला. ही घटना घडल्याला काही क्षणच झाले होते. जखम ताजी होती, मग रक्त भळभळल्यावाचून कसं राहील?
“नाही बाबा. मला माझी फसवणूक करून घ्यायची नाही. मला मुळी लग्नच करायचं नाही”, असं म्हणून मोई पुन्हा आतल्या खोलीत गेली. आत्ता, या क्षणी मोईची समजूत काढणं कठीण आहे, हे मोईच्या वडीलांना कळून चुकलं. ते पुन्हा आपलं काम हाती घेणार इतक्यात मिंगने बाहेरून मोईला हाक मारली.
“मोई आत आहे. तू आतच जा,” असं म्हणून मोईच्या वडीलांनी मिंगला आत जायला वाट मोकळी करून दिली. मिंगने आत जाऊन पाहिलं तर मोई तोंडावर हात दाबून गुपचूप रडत होती. मिंग तिच्याजवळ बसली आणि मोईला जवळ घेतलं. थोडा वेळ मिंग तिच्या पाठीवरून हात फिरवत राहिली. मोईला त्या सांत्वनाने खूप बरं वाटलं. तिने स्वत:हून मिंगजवळ आपलं मन मोकळं करण्याचं ठरवलं.
“बाबा, तुमची परवानगी असेल, तर मी थोडावेळ मिंगकडे जाऊन येऊ का? तिचं काही काम आहे माझ्याकडे.” मोईने बाहेर येऊन आपल्या वडीलांना विचारलं.
“जा. पण लवकर परत ये हं. तिन्हीसांजा उलटून गेल्यात. रात्रीचं एकट्या मुलीने फार वेळ बाहेर राहू नये.”
“हो बाबा. मी लगेच परत येते”, असं म्हणून मिंगचा हात धरून मोई घराबाहेर पडली. मोई काही बोलणार इतक्यात मिंगच म्हणाली, “मोई, फेई स्वत:च्याच घरात तुझ्यावरून कुणाला तरी शिवीगाळ करतो आहे. मोठमोठ्याने ओरडतोय. त्याचा आवाज इतका मोठा होता की माझ्या घरातूनही मला स्पष्ट ऐकू आला.”
हे ऐकल्यावर मोईने सर्व घडला प्रकार मिंगला सांगितला. मिंग ते ऐकून खूप चकित झाली. पण त्यांना जास्त वेळ बोलता आलं नाही. एकतर मोई वडीलांना ’लगेच येते’ म्हणून सांगून बाहेर पडलेली, त्यात फेई अजूनही रागात होता. न जाणो त्याने मोईला रस्त्यातच गाठल तर! त्यापेक्षा मोईने घरीच वडीलांसोबत असलेलं चांगलं म्हणून मिंग आणि मोईने तिथेच एकमेकींचा निरोप घेतला आणि त्या आपापल्या घराच्या दिशेने वळल्या.

ही कथा सुरूवातीपासून वाचावयाची असल्यास येथे टिचकी द्या.

0 Comments:
Post a Comment