आयडीयाची कल्पना


घरात नवीन लाकडी कपाट आल्यावर आधीची दोन जुनी लोखंडी कपाटं बाहेर कशी काढायची हा मोठ्ठाच प्रश्न होता. चार माणसांना एक रिकामं कपाट उचलता आलं, तरी ते दरवाज्यामधून बाहेर काढताना कुठेतरी भिंतींना ओरखडे येतील, दरवाजाच्या लाकडाचा टवका उडेल अश्या निरनिराळ्या भितीदायक शक्यता मनात गर्दी करून होत्या. पण काय आश्चर्य! त्या चौघा मजूरांनी दोन कपाटं हा हा म्हणता बाहेर नेली, तीही न उचलता!

कपाट रिकामं केलेलं होतं, त्यामुळे आत वजन असण्याचा प्रश्न नव्हता. रिकाम्या कपाटाचंच काय ते वजन. त्या चार जणांनी रिकामं कपाट एकदा उजच्या बाजूने, एकदा डाव्या बाजूने कलतं करून कपाटाच्या पायांखाली एक चादर अंथरली आणि चादरीची टोकं हातात धरून त्यांनी ते कपाट ओढत अगदी सहज बाहेर नेऊन ठेवलं. दुसरंही कपाट अशा रितीने बाहेर गेलं तरी माझ्या तोंडाचा वासलेला आ काही मिटायला तयार नव्हता. जवळ-जवळ दहा ते पंधरा मिनिटांचं काम त्यांनी अक्षरश: पाच मिनिटांत केलं होतं. ही आयडीयाची कल्पना मला फारच आवडली. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ असते म्हणतात, ती अशी.



7 Comments:

Mahendra Kulkarni Sunday, February 07, 2010  

अशा कामात हे माथाडी लेबर्स खुप हुशार असतात. चांगलं चार टन वजनाचं मशिन केवळ तिन माणस शिफ्ट करतात..
शक्ती पेक्षा युक्तीच श्रेष्ठ ठरते :)

कांचन कराई Sunday, February 07, 2010  

हो ना! अनुभवही शिकवून जातो अशा युक्त्या.

suhasonline Sunday, February 07, 2010  

What an Idea Sirji..oops Madamji :)

देवदत्त Monday, February 08, 2010  

आपला अनुभव सर्वांना सांगितल्याबद्दल धन्यवाद :)

ही युक्ती आम्ही फार पूर्वीपासून वापरत आहोत. आमच्या घरात फार जुने टेबल, कपाटं आहेत. त्यांना सरकवताना फार मदत होते. तसेच आजकाल असलेल्या टाईलवरून (काय म्हणतात ते विसरलो) घरातल्या घरात ही हे फार सोपे जाते. :)

कांचन कराई Monday, February 08, 2010  

प्रतिक्रियेसाठी धन्यवाद, सुहास.

देवदत, मी ही युक्ती पहिल्यांदाच पाहिली. हल्ली तर निरनिराळ्या प्रकारच्या टाईल्स असतात. कदाचित तुम्हाला स्पार्टेक्स म्हणायचं होतं.

अपर्णा Tuesday, February 09, 2010  

माझ्या जुन्या घरातुन असंच एक कपाट एक अमेरिकन एक हाती खाली उतरवुन आणि मग बाहेरच्या गाडीसाठी फ़क्त एक ट्रॉली वापरून घेऊन गेला होता...इथली माणसं ताकदीवर पण करताना पाहिलं आणि आपण नेहमीप्रमाणे युक्त्या वापरतो :)

कांचन कराई Tuesday, February 09, 2010  

ही युक्ती तर मला फारच आवड्ली. कपाट नेण्याआधीचा माझा चेहेरा आणि कपाट नेल्यानंतरचा माझा चेहेरा आठवून मलाच हसायला येतं आता.

Post a Comment

माझ्या साइटमध्ये सामील व्हा

हा कोड तुमच्या ब्लॉगवर लावा

कोड कॉपी पेस्ट करण्यासाठी Ctrl+C आणि Ctrl+V चा वापर करा.
living in India
Blogvani.com MyFreeCopyright.com Registered & Protected
MCN: BQ9D8-RRC42-B9AM5
marathisuchi - free marathi link sharing website & marathi blogs aggregator

मराठी ब्लॉगर्स

मोगरा फुलला on Twitter

या ब्लॉगचे चाहते

ताज्या प्रतिक्रिया

Disqus च्या सौजन्याने

उपस्थित वाचक

  © Blogger template On The Road by Ourblogtemplates.com 2009

Back to TOP