द काउंटरफिटर्स - हेराफेरी जगण्यासाठी


सॉलोमन उर्फ सॅलीच्या ऐयाश जीवनक्रमात अडथळा येतो, तो त्याला अटक होते तेव्हा. अटक झाल्यावर त्याची रवानगी कॉन्सन्ट्रेशन कॅम्पमधे करण्यात येते. कॉन्सन्ट्रेशन कॅम्पमधल्या कैद्यापुढे दोनच पर्याय असत. सशक्त असेल तर सक्तमजुरी आणि आजारी असेल तर मृत्यू.

आपल्यालाही यापैकी काहीतरी एक स्विकारणं भागच आहे हे सॉलोमनला माहित असतं. जगण्यासाठी त्याला तडजोड करावीच लागते. पण त्याच्या वाट्याला येते ती वेगळीच सक्तमजुरी. या मजुरीसाठी केवळ त्याच्या एकट्याचीच निवड केलेली नसते; त्याच्यासारखे आणखी काही तरबेज या कामासाठी निवडलेले असतात. सॉलोमनला प्रथमदर्शनी पहाताना तो एक निर्दय निर्ढावलेला गुन्हेगार वाटतो पण हळूहळू त्याच्या आतही एक माणूस आहे हे आपल्याला समजायला लागतं.



बनावट नोटांच्या आजतागायत घडलेल्या जगातील सर्वात मोठ्या व्यवहाराची ही कहाणी आहे. याला ऑपरेशन बर्नहार्ड असंही म्हटलं जातं. या प्लॅनचा कर्ताधर्ता होता नाझींच्या सैन्यातील मेजर शुट्झटाफल स्टम्बॅनफ्युहर बर्नहार्ड क्रूगर. या मेजरने सॅक्सनहॉसेनच्या कॉन्सन्ट्रेशन कॅम्पमधून सुमारे १४२ अशा कैद्यांना वेठीला धरलं जे त्याच्यासाठी नकली नोटा बनवू शकतात. नकली नोटा बनवायच्या आणि त्या विमानातून सगळीकडे उधळायच्या म्हणजे ब्रिटनचे नागरिक त्या गोळा करून खर्च करण्यासाठी वापरतील आणि नकली नोटांमुळे आपोआपच ब्रिटीश अर्थव्यवस्था खिळीखिळी होईल असा या प्लॅनमागचा हेतू होता. अर्थात हा हेतू सफल झाला नाही. हा हेतू सफल झाल असता तर जागतिक अर्थव्यवस्थाही लवकरच खिळखिळी झाली असती. हा हेतू जरी फसला असला तरी तयार नकली नोटांमधील काही नोटा चलनात आल्या होत्याच.

नाझींच्या काळात हेराफेरी करून जगणार्‍या सालोमन स्मूलिनऑफ नावाच्या माणसाने दबावाखाली येऊन नकली नोटा बनविण्यासाठी नाझींना कशी मदत केली. नकली नोटा ख-या वाटाव्यात म्हणून त्याने कोणते उपद्व्याप केले. त्याच्या साथिदारांनी त्याला कितपत साथ दिली. नंतर पुढे त्याचं काय झालं, त्याची ही सत्यकथा. नाझींच्या काळात अनेक कुशल, प्रशिक्षित आणि सुशिक्षित व्यक्तींनाही कैदी म्हणून डांबून ठेवलं जात असे. त्यातील काहींना तर त्यांच्या लायक कामही दिलं जायचं नाही. पण काही निवडक लोकांच्या नशिबात अशी निराळी शिक्षा भोगणं लिहिलेलं होतं.



Post a Comment

माझ्या साइटमध्ये सामील व्हा

हा कोड तुमच्या ब्लॉगवर लावा

कोड कॉपी पेस्ट करण्यासाठी Ctrl+C आणि Ctrl+V चा वापर करा.
living in India
Blogvani.com MyFreeCopyright.com Registered & Protected
MCN: BQ9D8-RRC42-B9AM5
marathisuchi - free marathi link sharing website & marathi blogs aggregator

मराठी ब्लॉगर्स

मोगरा फुलला on Twitter

या ब्लॉगचे चाहते

ताज्या प्रतिक्रिया

Disqus च्या सौजन्याने

उपस्थित वाचक

  © Blogger template On The Road by Ourblogtemplates.com 2009

Back to TOP